Site icon सक्रिय न्यूज

…..उलटा चोर कोतवाल को डाँटे…….!

…..उलटा चोर कोतवाल को डाँटे…….!

पुणे – शहरात तोडफोडीचे सत्र सुरु असून त्यात आता पोलिसांच्या अंगावर धावून पोलिसांना दमदाटी आणि अश्लील शिवागाळ केल्याचा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

सांगवी पोलिस कर्मचाऱ्यांनी विना मास्क न लावता दुचाकीवर निघालेल्या दोघांना आडवले. त्यावेळी आरोपीने थेट अंगावर धावून जात आरेवारी करत थेट पोलिसांची कॉलर धरुन अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी केली.“तुझ्या अंगावर वर्दी आहे नाहीतर इथे दाखवलं असतं”, अशा पद्धतीने आरोपी पोलिसांना धमकवतही होता. हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. अभिषेक राजू टेंकल आणि हरिश गणेश कांबळे अशी आरोपींची नावे असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दोन्हीही आरोपी पुण्यातील शिवाजीनगर येथील रहिवासी आहेत.

शेअर करा
Exit mobile version