मुंबई | ‘आई माझी काळूबाई’ या सिरीयलमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड हिला सिरीयलच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांनी विविध आरोप करत बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान यावर अभिनेत्री प्राजक्ताने आपण स्वतः सिरीयस सोडली असल्याचं सांगितलं आहे.
प्राजक्ताच्या सांगण्यानुसार, “सिरीयलच्या सेटवरील जवळपास 25 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं होतं. अशातच गावकऱ्यांनी अडवलं होतं त्यामुळे शूटिंग थांबलं होतं. यानंतर सर्व शूटींग मुंबईला शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्यासोबत एकाच गाडीने विवेक सांगळे येणार होता.”
प्राजक्ता पुढे म्हणते, “त्याला येण्यास उशीर झाल्याने मी विचारलं असता तो म्हणाला, कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्यांना रूग्णालयात दाखल करून आला होता. आणि त्याच्या सोबत मी प्रवास करणार यासंदर्भात विचारल्यानंतर त्याने शिवीगाळ केली. या घटनेबाबत अलकाताईंना सांगूनही त्यांनी दखल घेतली नाही. त्यांच्या मुलींच्या बाबतीत अशी घटना घडली असती तर मला खात्री आहे की त्या गप्प बसल्या नसत्या.”
“या घटनेनंतरही दीड महिना शूटींग केलं मात्र त्याने माझी माफीसुद्धा मागितली नाही. याच कारणाने मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मुळात एक स्त्री म्हणून अलकाताईंनी या प्रकरणाची दखल घेणं गरजेचं होतं. तुम्हाला सीरिअल पुढे चालवायची आहे म्हणून तुम्ही अशा नराधमांना पाठिशी घालणं फार चुकीचं,” असल्याचा आरोपंही प्राजक्ताने केलाय.