बीड – जळगाव शहराचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे याची शिवाजीनगर परिसरात स्मशानभूमीजवळ निघृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
परवा रात्री 11.30 च्या सुमारास राकेश शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरातून येत असताना दोन अज्ञात तरुणांनी राकेशच्या गळ्यावर मांडीवर धारदार शस्त्रानी सपासप वार केले आणि हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.राकेश रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर स्थानिकांनी जखमी अवस्थेत राकेशला खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तपासणी करुन डॉक्टरांनी राकेश याला मृत घोषित केलं.पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतल्याचं कळतंय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.