Site icon सक्रिय न्यूज

देशभरातील ”या” 30 शहरांत निर्माण होणार मोठे पाणी संकट……..WWF चे सर्वेक्षण……..!

पुढील 30 वर्षात जगभरातील 100 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसंकट निर्माण होणार असून यामधील 30 शहरे हे भारतातील आहेत.
पाण्याविना जगात काहीही नाही, असं म्हटले जाते. दक्षिण आफिकेचे केपटाऊन असो किंवा भारताचे चेन्नई असो, पाण्याचे संकट जगभरातील सर्वच देशांमध्ये दिसून येत आहे. वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडने केलेल्या नवीन सर्वेक्षणात याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार पुढील 30 वर्षात जगभरातील 100 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसंकट निर्माण होणार असून यामधील 30 शहरे हे भारतातील आहेत.
● पाणीटंचाईसंबंधी एका यादीत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर या शहरांचा समावेश आहे. पाणीटंचाई त्याचबरोबर हवामानामध्ये काही बदल झाले आणि माणसाने योग्य पावले उचलली नाहीत तर 2050 पर्यंत करोडो नागरिकांना या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
भारतातील 30 शहरांचा समावेश : हे जलसंकट येण्याची शक्यता असलेल्या 100 शहरांची यादी घोषित केली आहे त्यामध्ये भारतातील जयपूर आणि इंदूर अनुक्रमे 45 व्या आणि 47 व्या क्रमांकांवर आहे. या यादीच्या समांतर आणखी एक यादी बनवण्यात आली असून यामध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणीसंकटाचा सामना करावा लागू शकतो अशी ठिकाणं आहेत. यामध्ये देखील भारताच्या 28 शहरांचा समावेश आहे. पुणे, अमृतसर, श्रीनगर, कोलकाता, बेंगलूरु, मुंबई, कोझिकोड, विशाखापट्टणम, ठाणे, बडोदा, राजकोट, कोटा, नाशिक, अहमदाबाद, जबलपूर, हुबळी-धारवाड, नागपूर, चंडिगड, लुधियाना, जालंधर, धनबाद, भोपाळ, ग्वालियर, सुरत, दिल्ली, अलिगढ, लखनऊ आणि कानपूर या शहरांचा या यादीमध्ये समावेश आहे. तर एकूण ३० शहरांच्या यादीमध्ये लुधियाना, अमृतसर, अहमदाबाद आणि चंदीगड सर्वांत वर आहेत.
● WWF च्या सर्वेक्षणामध्ये केलेल्या दाव्यानुसार या 100 शहरांच्या यादीमधील निम्मी शहरे चीनमधील असून भविष्यात या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंकट निर्माण होणार आहे. पुढील 3 दशकांमध्ये या ठिकाणी भयानक जलसंकट निर्माण होणार आहे. त्याचबरोबर दक्षिण आशिया, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका आणि अफ्रिकेमधील अनेक शहरांचा समावेश आहे. पण भारतातील इतक्या जास्त संख्येने या शहरांचा या यादीत समावेश होणे हे चिंताजनाक आहे.
● जगभरात सर्वांत जास्त धोका कुठे ? :  भारतातील शहरांव्यतिरिक्त इतर अनेक देशांमधील शहरे देखील आहेत. इजिप्तमधील एलेग्ज़ेंड्रिया शहराचा या यादीमध्ये पहिला क्रमांक आहे. यानंतर मक्का, चीनचे टांगशान आणि सऊदी अरबच्या अद दम्माम आणि रियाध शहरांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. या यादीमध्ये सर्वांत शेवटी असणाऱ्या 10 शहरांमध्ये सिएरा लिओनचे फ्रीटाउन, चीनमधील ताइयुआन, वेनलिंग, गुइयांग, यानताई आणि जियाजिंग या शहरांचा समावेश आहे.
● 100 शहरांच्या या यादीमध्ये प्रमुख शहरांपैकी बीजिंग, जकार्ता, जोहान्सबर्ग , इस्तंबुल, हाँगकाँग आणि रिओ दी जेनेरो या शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये जमीन आणि वॉटरशेडसंबंधी काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ऑर्गेनायज़ेशन फॉर इकॉनॉमिक को ऑपरेशन अँड डेवलपमेंटअनुसार वेस्टवॉटर ट्रीटमेंट, पाण्याचे प्लँट उभारणं आणि सप्लायसाठी 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतका खर्च केल्यास ही समस्या सुटेल.
शेअर करा
Exit mobile version