Site icon सक्रिय न्यूज

पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या……! केज तालुक्यातील घटना…..!

केज दि.६ – तालुक्यातील केवड येथे पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पती विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपा वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
          केज तालुक्यातील सविता रामदास कोल्हे हिने दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वा. केवड ता. केज येथे पतीच्या नेहमीच्या भांडणाला व त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत मयत विवाहितेचा भाऊ आत्माराम महादेव गायकवाड रा. भाटसांगवी ता. कळंब जि. उस्मानाबाद यांच्या फिर्यादी वरून मयतेचा पती रामदास कोल्हे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.
—————————————–
केज तालुक्यात सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग
—————————————
 केज दि.६ – तालुक्यात सासऱ्यानेच आपल्या सुनेचा विनयभंग  केल्याची घटना घडली असून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. ११ऑक्टोबर तालुक्यातील एका गावात सकाळी ११ वा. राहत्या घरी सासऱ्याने त्याच्या सुनेची वाईट हेतूने साडी ओढली व हाताला धरून विनयभंग केला. या बाबत तिने जाब विचारला असता सासरा, सासू, दीर व नणंद यांनी तिला मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने दि.१६ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता. त्याची चौकशी करून दि. ६ नोव्हेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करीत आहेत.
——————————————–
मा.आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सहविचार सभा……
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ केज शहरातील शिक्षकांची पतपेढी येथे दि.7 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

शेअर करा
Exit mobile version