बीड – नुकताच राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 9 तारखेला ठाकरे सरकारविरोधात रक्षा खडसे रस्त्यावर उतरणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने रक्षा खडसे आंदोलन छेडलंय. रक्षा खडसे यांच्याकडून जळगाव जिल्हाधिकारी कार्यलयासमोर त्या मोठं आंदोलन करणार आहेत.गेल्या 4 महिन्यांपासून मागणी करुनही राज्य सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. इतर जिल्ह्यातील मंत्री त्या ठिकाणी जाऊन पॅकेज घोषित करतायत, मग जळगावात का नाही? असा सवालंही रक्षा खडसे यांनी उपस्थित केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी तसंच केळी उत्पादक 2019 या वर्षातील बँकांच्या चुकांमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेत. शिवाय पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली नसल्याचा दावा करण्यात येतोय.