Site icon सक्रिय न्यूज

का घेतली असेल बरे आज चंद्रकांत पाटलांनी राज्यपाल महोदयांची भेट……?

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अचानक भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कालच राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीचा प्रस्ताव दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अर्णब गोस्वामी प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांची चंद्रकांत पाटील यांनी आज घेतलेली ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती? हे अद्याप कळू शकलेलं नाही.

शेअर करा
Exit mobile version