मुंबई – रोषणाई करा, फराळ बनवा, पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मात्र एकीकडे फटाके वाजवू नका म्हणून आवाहन करायचे अन दुसरीकडे फटाक्यांच्या दुकानांना परवानगी द्यायची याने प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल का ? हा प्रश्न आहे
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचं का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.पूर्वीच्या काळात फटाके वाजवण्यात गंमत होती. मात्र, अलीकडच्या काळात लोकसंख्या आणि प्रदूषण वाढले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होऊन कोरोनाचा धोका वाढत असेल तर आपण फटाक्यांवर बंदीऐवजी स्वत:वर काही बंधने घालून घेऊ शकत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मात्र एवढ्या वर्षी तरी किमान फटाक्यांच्या दुकानांना परवानगी न देणे उचित ठरले असते.