मुंबई | रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आता अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात हलवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्वत पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.
गोस्वामी यांना अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात हलवण्याचा निर्णय घेतला. अलिबागवरून तळोजाच्या दिशेने रवाना होत असताना अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिलं जात नाही, असं सांगितलं. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी भाष्य केलंय.
अर्णब गोस्वामी यांचं प्रकरण उच्च न्यायालयामध्ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ राज्य सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे, असं नारायण राणेंनी म्हटलंय.
गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल, असं म्हणत नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधलाय.