Site icon सक्रिय न्यूज

मी अर्णवला भेटायला जेलमध्ये जाणारच…….!

मी अर्णवला भेटायला जेलमध्ये जाणारच…….!

मुंबई | भाजप आमदार राम कदम आज अर्णब गोस्वामी यांना जेलमध्ये भेटायला जाणार आहेत. त्यावेळी ‘हिंमत असेल तर अडवूण दाखवा’, असे जाहीर आव्हान राम कदम यांनी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना दिले आहे.

राम कदम यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. ट्विटमध्ये राम कदम म्हणाले की “आज सकाळी 11 वाजता मी तळोजा कारागृहात जाऊन अर्णब गोस्वामी यांची भेट घेणार आहे”.देशातील 130 कोटी जनतेचा प्रतिनीधी म्हणून अर्णब गोस्वामी यांना भेटायला जाणार असल्याचेही राम कदम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी राम कदम घाटकोपर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी चालत गेले होते.

शेअर करा
Exit mobile version