Site icon सक्रिय न्यूज

अखेर दोघांनाही मागावी लागली माफी……!

बीड –  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर खडसेंनी माफी मागावी अशी मागणी केली जात होती. एकनाथ खडसे यांनी ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या व्यक्तव्यावरुन माफी मागितली आहे. ब्राह्मण बांधवांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नसल्याचं एकनाख खडसेंनी स्पष्ट केलंय.

 दि. 6 नोव्हेंबर 2020 रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” असे ट्विट केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पद मी ब्राम्हणाला दान केल्याचं खडसे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर पुण्यातील ब्राम्हण महासंघाने आक्षेप घेत त्यांनी तातडीने मागावी अशी मागणी केली होती.

————————————————-

जेष्ठ संपादकांनीही मागितली माफी…….!
दरम्यान काल एका वर्तमानपत्रात जेष्ठ संपादक रवींद्र तहकीक यांनी समस्त शिक्षक वर्गाचा आणि शिक्षण क्षेत्राचा अवमान होईल असे लिखाण करून अवहेलना केली होती. मात्र याचे पडसाद राज्यभर उमटले आणि संबंधित संपादकां विरोधात आक्रोश निर्माण झाला होता. शेकडो शिक्षकांनी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोबाईल च्या माध्यमातून जाब विचारला होता तर कांही ठिकाणी तर पोलिसात तक्रारी सुद्धा झाल्या.
मात्र आज अखिल भारतीय क्रांती सेनेचे पदाधिकारी संबंधित कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेले असता संपादक महोदयांनी त्यांच्या लेखनाबद्दल जाहीर माफी मागीतल्याचा विडिओ सर्वत्र वायरल झाला आहे.  

शेअर करा
Exit mobile version