Site icon सक्रिय न्यूज

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न……

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न……
 पुणे – एटीएम सेंटरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला कलर स्प्रे मारून चोरट्यांनी लाखोची रोकडा असलेल्या एटीएम उघडून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेत सायरन वाजल्याने व एटीएम दरवाज्यात अडकल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. ही घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रांजणगावमधील दत्तनगर भागातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम वर घडली पोलीस त्या चोरट्यांचा शोध घेत आहे.

रात्री अडीच वाजेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी वाळूज एमआयडीसी भागातील दत्तनगर या वर्दळीच्या ठिकाणी असलेले आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरला लक्ष केले चोरीची घटना सीसीटीव्ही काय होऊ नये त्यासाठी चोरट्यांनी सोबत आणलेले कलर चे स्प्रे हे दर्शनी भागात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा वर मारले त्यानंतर एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून अख्खाच्या अख्खा एटीएम उखडून काढला.

मात्र ते एटीएम अवजड असल्याने सहजासहजी ते बाहेर काढता आले नाही. त्यासाठी चोरट्यांनी काचेचा दरवाजा तोडला व बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील लोखंडी अँगलमध्ये ते एटीएम अडकले दरम्यान दिल्ली येथील मुख्य कार्यालयाला एटीएम सेंटर मधल्या हालचाली जाणवल्या त्यामुळे त्वरित ही माहिती वाळूज पोलीस ठाण्याला कळविण्यात आली. ड्युटीवर असलेले उपनिरीक्षक सतीश पंडित व पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले दरम्यान तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. चोरट्यांचा माग काढण्यासाठी डॉग्स पोट आणि फिंगरप्रिंट एक्सपोर्ट ना पाचारण करण्यात आले आहे.

शेअर करा
Exit mobile version