Site icon सक्रिय न्यूज

जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता – डॉ. अर्चना पाटील

पुणे | कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. यावरच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या आहे.
                या काळासाठी खबरदारी म्हणून डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व डॉक्टरांना, सरकारी रुग्णालयांना, जि्ल्हा रुग्णालयांना, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत कोरोनाच्या येणाऱ्या लाटेसाठी तयार राहण्याचं नमूद केलं आहे.
रोज होणाऱ्या कोरोनाच्या चाचण्या कोणत्याही परिस्थितीत थांबवू नका. त्याचप्रमाणे शहरी तसंच ग्रामीण भागातील फिव्हर क्लिनिक्सनी दररोजचे सादर करावे असंही पत्रात नमूद केलं गेलं आहे.
डॉ. अर्चना पाटील यांच्या सांगण्यानुसार, “कोविड आणि नॉन कोविड रुग्णांना वेळेवर उपचार मिळणं गरजेचं आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील कोविड सेंटर्सने सज्ज रहाणं गरजेचं आहे.”

 

शेअर करा
Exit mobile version