औरंगाबाद | भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
एका व्यक्तीचं तिकीट कापून मी शिरीष बोराळकर यांच्या कार्यक्रमाला आले, त्यामुळे जो काही मेसेज द्यायचा तो मी दिला आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि माझी दोन दिवसांपूर्वीच भेट झाली होती. ते माझ्या घरी नाश्ता करण्यासाठी आले होते. यावेळी मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, याबद्दलही माझे त्यांच्याशी बोलणे झाले. ही संघटनेची आढावा बैठक होती, त्यापूर्वीच्या संध्याकाळी मी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय.