मुंबई | भाजप नेते नारायण राणे यांनी दिवाळीनंतर भाजप सरकार पडणार, भाजप राज्यात दिवाळीनंतर ऑपरेशन लोटस राबवणार, असा दावा करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
नारायण राणे दुःखी आत्मा आहेत. त्यांची विक्रम-वेताळसारखी अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका शिवसेना नेत्या नील्हम गोऱ्हे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी 12 डिसेंबरपर्यंत त्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.नीलम गोऱ्हे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाष्य करत किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. किरीट सोमय्या यांचं व्यक्तीमत्व पाहिलं तर त्यांचे विषय जेवनातल्या लोणच्याप्रमाणे आहेत. किरीट सोमय्या पांचट आहे हा वायकरांचा शब्दप्रयोग मला फार आवडला, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला.