Site icon सक्रिय न्यूज

अबब……”या” क्रिकेटर कडे सापडली कोटीची घड्याळं………!

मुंबई | आयपीएल संपवून भारतात परतलेल्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू कृणाल पंड्या याला महसूल गुप्तचर संचलनालयाने ताब्यात घेतलं होते. कृणालच्या बॅगेत दुबईवरून आणलेली महागडी रत्नजडित घड्याळं सापडली आहेत.

या घड्याळांवरील आयात शुल्क चुकवण्यासाठी कृणालने ही घड्याळं बॅगेत लपवली असल्याचं म्हटलं जातंय. या घडाळ्यांची गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच कृणालला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतलं.यानंतर डीआरआयकडून  कृणालची तीन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलंय. ही घड्याळं सध्या मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या ताब्यात असून कृणालला सीमाशुल्क आणि दंड भरावा लागणार आहे.

कृणालने आणलेल्या या घडाळ्यांची किंमत जवळपास 1 कोटींच्या घरात आहे. परदेशातून भारतात आयात केल्या जाणाऱ्या चैनीच्या वस्तूंवर 38.5 टक्के इतका कर भरावा लागतो.

शेअर करा
Exit mobile version