Site icon सक्रिय न्यूज

महाराष्ट्रातील ”या” तीन नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी…..….

  मुंबई – भाजपकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विनोद तावडे यांच्याकडे हरियाणाचे प्रभारीपद सोपवण्यात आलं आहे. तर मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. तर विनोद तावडे यांनाही गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे हे दोन्ही नेते पक्षावर नाराज होते. काही दिवसांपूर्वी भाजपकडून या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेण्यात आलं होतं.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील नेत्यांना महत्वाची जबाबदारी दिल्याचं बोललं जात आहे.

शेअर करा
Exit mobile version