बीड दि.14 – मागच्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे व इतर सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे दिवाळी पाडव्याच्या (सोमवार) मुहूर्तावर उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉक डाउन मध्ये सर्व प्रार्थनास्थळांना सुद्धा टाळे लागले होते.त्यामुळे लाखो लोकांच्या हातचे काम गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान मागच्या दोन महिन्यांपूर्वी कांही अंशी उद्योगांना सूट दिल्यानंतर प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी भविकांसह विरोधी पक्षांनी केली होती.