Site icon सक्रिय न्यूज

”या” मराठमोळ्या अभिनेत्याने दिवाळीला तयार केले आईच्या जुन्या साडीपासून कपडे……..!

लातूर – लातूरकर मराठमोळा अभिनेता मात्र हिंदी चित्रपट सृष्टीत आपले वेगळे नाव करणारा रितेश देशमुख हा नेहमीच काहीतरी हटके करत असतो. या दिवाळी ही त्याने एक असाच एक हटके व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख आपल्या दोन मुलांसह कुर्ता-पायजामा परिधान केलेला दिसत आहे. आणि विशेष म्हणजे हे कपडे त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून तयार केले गेले आहेत.
        रितेशने यासंदर्भात माहिती दिली असून दिवाळीनिमित्त रितेश देशमुख यांने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशची आई हवेत साडी झटकताना दिसत आहे. तर, काही सेकंदात रितेश देशमुख आणि त्याची दोन्ही मुले एकाच रंगाचे कपडे घालून दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

 

                     ‘आईची जुनी साडी, मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे. दिवाळीच्या शुभेच्छा’, असे म्हणत रितेशने व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ काही सेकंदातच लाखोंच्या पसंतीस उतरला आहे. 

शेअर करा
Exit mobile version