पहा कसा झाला सुपरस्टार चिरंजीवी च्या कोरोना रिपोर्ट मध्ये गोंधळ……! नेमके काय घडले चौथ्या दिवशी…..?
डी डी बनसोडे
मुंबई – तांत्रिक चुकांमुळे काय गोंधळ होऊ शकतो याची प्रचिती प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांना नुकताच आला आहे. तीन दिवसांपूर्वी सुपरस्टार ‘चिरंजीवी’ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड सुरु झाला.मात्र चार दिवसानंतर पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली असता चिरंजीवी यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. स्वतः चिरंजीवी यांनी याबद्दल ट्वीट केलं आहे. चुकीच्या टेस्टिंग किटमुळे रिपोर्ट मध्ये गोंधळ झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
चिरंजीवी म्हणाले कि, ‘रविवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार सुरू झाले होते. पण लक्षणं नसल्याने मला शंका आली. डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा सीटी स्कॅन करायला सांगितलं. त्यातही कोरोनाचा संसर्ग गिसला नाही. मग पुन्हा टेस्ट केली तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही माझी तीन वेगवेगळ्या किटने चाचणी करण्यात आली. RT PCR टेस्टही पुन्हा केली गेली. पण तीही निगेटिव्ह आली आहे. चुकीच्या टेस्टिंग किटमुळे हा गोंधळ झाला होता या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.