Site icon सक्रिय न्यूज

धार्मिकस्थळे उघडणार मात्र ”या” भाविकांना प्रवेशबंदी,परंतु सक्ती नाही……..! मार्गदर्शक सूचना जारी……!

मुंबई – राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू होत असली तरी ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवती महिलांनी घरीच थांबावे, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी धार्मिकस्थळांमध्ये जाणे टाळावे असे आवाहन करणाऱ्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने शनिवारी जारी केल्या. तसेच या सूचनांचे धार्मिकस्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनी कठोर पालन करावे, असेही सांगितले आहे.           
प्रार्थना स्थळांमध्ये भाविकांना प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारने व्यवस्थापनांना दिले आहेत. त्यानुसार  मास्कचा वापर, धार्मिकस्थळी प्रवेश करण्यापूर्वी हातांचे र्निजतुकीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.तसेच प्रतिबंधित भागातील धार्मिकस्थळे बंदच राहणार आहेत.
       दरम्यान ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, लहान मुले किंवा व्याधीग्रस्तांनी मंदिर प्रवेश टाळावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु, या वर्गातील नागरिकांना रोखण्याची सक्ती केलेली नाही. मात्र मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्यांनी या वर्गातील नागरिकांना प्रवेश देऊ नये, असे सरकारने म्हटले आहे.

शेअर करा
Exit mobile version