नवी दिल्ली | कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचं जेतेपद पटकावलंय. तर आयपीएलमध्ये विराट कोहलीला तसंच त्याच्या संघाला साजेशी कामगिरी न करता आल्याने त्याच्यावर टीका होतेय.
यातच आता टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवावी अशी मागणी मागणी खेळाडू गौतम गंभीर याने केली आहे.
गौतम गंभीर म्हणाला, “आता विराट कोहलीनेच कर्णधारपदावरून पायउतार होताना ट्वेंटी-20 संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली पाहिजे.”
दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैन यांनी देखील रोहितच्या खेळीचं कौतुक केलं आहे. शिवाय ट्वेंटी-20 वर्ल्डकपसाठी विराट कोहलीने कर्णधारपदावरून पायउतार होऊन रोहितकडे जबाबदार सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं ते म्हणालेत.