Site icon सक्रिय न्यूज

जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) मोठं विधान……..!

दिल्ली – मागच्या आठ महिन्यांपासून  जगभरात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. जवळपास 1.3 दशलक्ष लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठं विधान केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनॉम घेब्रेसस यांच्या सांगण्यानुसार, केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाहीये. ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या विषाणूशी लढण्यासाठी कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल. पंरतु केवळ लस ही स्वतः महामारी संपवू शकत नाही.

तसंच येत्या काळात या विषाणूचं अस्तित्व कायम राहील. त्यामुळे रूग्णांच्या चाचण्या होणं, त्यांना क्वारंटाइन करणं, ट्रेसिंग आणि डिस्टंसिंग पाळणं आवश्यक असणार असल्याचं, ते म्हणाले.
शेअर करा
Exit mobile version