Site icon सक्रिय न्यूज

मा.केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा……!

ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला मोठा धक्का दिलाय. मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, भाजपला जास्त मस्ती आली आहे आणि त्यांना मी धडा शिकवणारच अशा शब्दांत जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपावर आगपाखड केली आहे.

…………ते  पुढे बोलताना म्हणाले की, “भाजपला पराभूत करण्यासाठी मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतोय. सध्या भाजप हा पक्ष फार हवेत गेलाय. ते विमानापेक्षाही अधिक उंचीवर आहेत. परंतु आता मी भाजपला धडा शिकवणारे आणि त्यासाठी भाजपने तयार राहावं.”

“मला केवळ पक्ष मजबूत करण्यासाठी काम करायचं होतं. गेल्या 10 वर्षांपासून मी नेतृत्त्वाकडे मागणीही केली. पण, तरीही पक्षाने संधी न दिल्याने मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला”, असं गायकवाड यांनी स्पष्ट केलंय.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version