बिहार निवडणुकीत काँग्रेसला म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आली नाही. या निकालानंतर कपिल सिब्बल यांनी काँग्रेसने आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं.या वक्तव्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीका केली असून खुर्शिद यांनी एक फेसबूक पोस्ट लिहित सिब्बल यांना सदैव संशय घेणारा व्यक्ती असं म्हटलंय.
खुर्शीद म्हणतात, “सत्तेतून बाहेर असणं हे सार्वजनिक आयुष्यात स्विकारणं सोपं नाही. मात्र जनतेनेच तो कौल दिला असेल तर ती बाब आपण स्विकारली पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड करावी लागणार असेल तर त्यापेक्षा अशी सत्ता सोडलेली बरी.” तर एका मुलाखतीदरम्यान ज्यांना पटत नसेल त्यांनी पक्ष सोडून बाहेर जावं असाही सल्ला सलमान खुर्शीद यांनी दिलाय.