केज दि.१८ – तालुक्यातील धर्माळा येथील महेश सुरेश कदम या 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्या नेमकी का केली? हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
तालुक्यातील धर्माळा येथील महेश नामक तरुणाचा मृतदेह स्वतः च्या शेतातील लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत मंगळवारी आढळून आला. दरम्यान सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
बुधवारी सदरील तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आयटीआय चे शिक्षण घेत असलेला महेश पोटाच्या आजाराने त्रस्त होता असे समजते. मात्र आत्महत्या का केली? हे स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.