Site icon सक्रिय न्यूज

……अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघतील……!

मुंबई – दि.१९ – मनसेने राज्यातील जनतेला वीजबिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. वीजबिल भरू नका. काय होतं ते पाहू पुढे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

एकीकडे सरकार निर्णय घेऊ म्हणून सांगत आहे आणि दुसरीकडे राज्याचे मंत्री वाढीव बिल माफ केलं जाणार नसल्याचं सांगतात. तुमच्यातच एकोपा नसेल तर लोकांनी त्याचा भुर्दंड का सोसायचा? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी केलाय.सोमवारनंतर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे मोर्चे निघतील. सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू. तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

शेअर करा
Exit mobile version