Site icon सक्रिय न्यूज

वीज बिला संदर्भात राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय…….!

वीज बिला संदर्भात राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय…….!

मुंबई दि.१९ – कृषी पंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरली तर शेतकर्‍यांना 50 टक्के वीजबिल माफी मिळणार, असा निर्णय सरकारने घेतला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बेठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊर्जा विभागातील शेती विषयक धोरणं मांडण्यात आली. आज शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शनबाबत निर्णय घेण्यात आला.ग्रामीण भागात शेती पंपाची बिकट अवस्था आहे. आता 66 टक्के निधी त्यासाठी वापरण्यात येईल. 40 हजार कोटींची थकबाकी होती, त्याबाबत निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांची मागील 5 वर्षांची थकबाकी होती, त्याचे डीले चार्जेस माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version