पुणे – दि.२० – अव्वाच्या सव्वा दिलेली वीज बिले कमी करावीत या मागणीसाठी विरोधी पक्षांनी रान उठवले आहे.विविध संघटनाही आक्रमक झाल्या असून सरकार विरोधात आंदोलन करण्याचा पावित्र्यात आहेत.आणि याचाच एक भाग म्हणून, विविध मागण्यांसाठी व मदतीसाठी आंदोलन करून सलून व्यवसायिकांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सोमवारपासून राज्यभर वीज बिलमाफी तसंच विविध मागण्यांसाठी आक्रमक आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं नाभिक समाज नेते तथा सलून अँन्ड पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी सांगितलं आहे.
उर्जामंत्र्यांच्या वक्तव्याचा सोमनाथ काशीद यांनी निषेध व्यक्त करत आंदोलनाची हाक दिली आहे. उर्जामंत्र्यांच्या भूमिकेने सर्वसामान्यांना मोठा शॉक बसला आहे आहे, असं काशीद म्हणाले.सोमवारपासून वीज बिल माफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी सलून अँन्ड पार्लर असोसिएशनतर्फे आम्ही सरकारविरोधात आक्रमक आंदोलन करणार असल्याचं काशीद यांनी सांगितले आहे.
सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.