Site icon सक्रिय न्यूज

माझे लाईट बिल माझी जबाबदारी…….!

माझे लाईट बिल माझी जबाबदारी…….!

मुंबई | वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘माझे लाईट बिल माझी जवाबदारी’, असं म्हणतं ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.राज्य सरकारने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो टाकत, माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी, असा टोला किरीय सोमय्यांनी लगावला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळात वीजग्राहकांना सवलत देण्यावरून बरीच चर्चा झाली. शेतकरी तसेच सामान्य ग्राहकही वीज बिले भरत नसल्याने महावितरणची थकबाकी तब्बल 67 हजार कोटींवर गेल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बैठकीत दिली.

शेअर करा
Exit mobile version