Site icon सक्रिय न्यूज

”या” मुळेच रुग्ण वाढले – पेडणेकर

मुंबई दि.२० – कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. तसेच लोकल ट्रेन सुरु झाल्यास कोरोना सर्वदूर पसरण्याचा धोका आहे. ट्रेन सुरु झाल्यास सर्व शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचू शकतो. परिणामी मुंबईत बिकट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे रेल्वे सुरु होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

शाळा सुरु झाल्या की ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, या मोहिमेत खंड पडेल. सोशल मीडियावरही पालक शाळा उघडू नका, हेच म्हणत आहेत. त्यामुळे मुंबई परिसरातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय.
शेअर करा
Exit mobile version