Site icon सक्रिय न्यूज

एकाच शाळेत 20 शिक्षक कोरोना बाधित…….! उस्मानाबाद शहरातील चित्र……..!

 उस्मानाबाद दि.२० – शाळा सुरू करण्या आधीच उस्मानाबाद जिल्ह्यात 20 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून खळबळ उडाली आहे. शिक्षकांना चाचणी सक्तीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातही कोरोना चाचणी सुरु आहे. शहरातील सर्वात मोठी संस्था असलेल्या श्रीपतराव भोसले हायस्कूल या शाळेमधील तब्बल वीस शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version