Site icon सक्रिय न्यूज

शाळा सुरू करण्यात सावळा गोंधळ ……….?

शाळा सुरू करण्यात सावळा गोंधळ ……….?

मुंबई – दि.२१ – शाळा उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर शाळा बंद ठेवण्यात आल्यात आहेत. या निर्णयावरून भाजपने पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

मुंबई तसंच ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. शाळा सुरू करण्यात सावळागोंधळ, महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?, असा सवाल शेलार यांनी केलाय.

आशिष शेलार म्हणाले, “शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच. पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही. शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? पालक, विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. भयभीत आहेत.”

 “परीक्षा घेण्यावरुन संभ्रम, परीक्षा घेतल्या त्यात पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप, प्रवेशवरून गोंधळ, फी वाढीबाबत हतबलता, अभ्यासक्रमाबाबत ही प्रश्नचिन्ह आहेत. शाळा सुरू करण्यात तर सावळागोंधळ असून महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?” असा सवाल उपस्थित केला आहे.
शेअर करा
Exit mobile version