Site icon सक्रिय न्यूज

आता ”ह्या” वयातील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय सामने……..!

आता ”ह्या” वयातील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय सामने……..!

मुंबई  दि.२१ – आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसी वयोमर्यादेचा एक नवीन नियम बनवला आहे. या नियमानुसार 15 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.हा नियम वरिष्ठ पुरुष, महिला आणि 19 वर्षाखालील संघांनाही लागू होणार आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम बनवला असल्याचे आयसीसीने सांगितले आहे. याआधी आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी वयोमर्यादेचा नियम नव्हता. परंतू या नविन नियमानुसार आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूचे वय 15 किंवा त्यापेक्षा कमी आहे की नाही हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, आयसीसीने असेही म्हटले आहे की, अपवादात्मक परिस्थितीच एखाद्या संघाला वयाचे निकष न पाळणाऱ्या खेळाडूला खेळू देण्याची परवानगी मिळू शकते.

शेअर करा
Exit mobile version