कोल्हापूर दि.२१ – जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात 16 मराठा पोस्टवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात निगवे खालसा येथील संग्राम पाटील यांना वीरमरण आले आहे.
शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. निगवे खालसा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
गेल्याच आठवड्यात जवान ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांनी देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली आहेत.