बंगरुळू – कर्नाटक राज्यात महाविद्यालये सुरू झाल्यानंतर चारच दिवसांत तब्बल 123 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 40 प्राध्यापकही बाधित आले आहेत.राज्यात 17 नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. कोरोना तपासणीचा अहवाल आल्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचार्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात येत आहे; पण तपासणीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांत पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी बंगळूर येथे 19, चित्रदुर्गात 16, उडपीमध्ये 7, चामराजनगरात 10, रामनगरात 4, धारवाडमध्ये 3 आणि कोलारमध्ये दोघा विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे.