Site icon सक्रिय न्यूज

सोमवारी भेटूच…….शॉकसाठी तयार रहा…….!

मुंबई दि.२२ – वीजबिलाच्या मुद्द्यावरून  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला असून  संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

              होर्डिंग्ज लावताना मनसेने ठाकरे सरकारच्या ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या वाक्याला टार्गेट केलंय. मनसेकडून लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, असं लिहिण्यात आलंय.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीजबिल माफ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मनसेने कठोर निर्णय घेत थेट आंदोलनाचा इशारा दिलाय.मनसेनेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावलेत. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्यांना केवळ त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतोय आणि त्यासाठी ही होर्डिंगबाजी करण्यात आली असल्याचं किल्लेदार यांनी सांगितल आहे.

शेअर करा
Exit mobile version