Site icon सक्रिय न्यूज

मुख्यमंत्री आज रात्री 8 वाजता साधणार संवाद……महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता……!

मुख्यमंत्री आज रात्री 8 वाजता साधणार संवाद……महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता……!

मुंबई दि.२२ – देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवाळीनंतर वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे लॉकडाउन किंवा वीज बिल सवलतीबद्दल उद्धव ठाकरे यावेळी काय घोषणा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज रात्री 8 वाजता जनतेशी फेसबुक, युट्यूबवर लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहे. ते राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी वाढीव वीज बिल व शाळा सुरू करण्याच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शेअर करा
Exit mobile version