Site icon सक्रिय न्यूज

सरकार कसं येणार हे लवकरच पत्रकारांना कळवतो…….!

परभणी दि.23 – आपल्या बेधडक बोलण्यामुळे नेहमीच अडचणीत सापडणारे आणि चर्चेत राहणारे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात हे सरकार पडेल असं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे.
               पुढे बोलताना दानवे म्हणाले की, “येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. आणि आपलं सरकार कसं येणार आहे मी लवकरच पत्रकारांना कळवतो.”

दरम्यान कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत असल्याची टीकाही दानवे यांनी केली आहे.तीन वेळेस हा मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपाकडे होता. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तो राष्ट्रवादीकडे गेला. नाहीतर हा मतदारसंघ आपल्या हातून जात नव्हता, असंही दानवे यांनी सांगितले.

शेअर करा
Exit mobile version