केज दि.२४ – पत्नी, मुलास मारहाण केल्याच्या कारणावरून तिघांनी काठीने व कोयत्याने हल्ला करीत एका तरुणास गंभीर जखमी केल्याची घटना केज तालुक्यातील शिंदीफाटा येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदीफाटा येथील दीपक बालासाहेब कदम ( वय २५ ) हा तरुण पाच नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोर उभा असताना बाळू देविदास काळे, आशिष बाळू काळे, विकास आसाराम खळगे ( रा. शिंदी ) हे तिघे तिथे आले. बाळू याने दीपक यास तू माझ्या पत्नी, मुलास का मारहाण केलीस ? असे म्हणत त्याने हातातील कोयत्याने दीपक याच्या डाव्या हातावर मारून गंभीर जखमी केले. तर आशिष व विकास या दोघांनी शिवीगाळ करून काठीने दीपक याच्या मांडीवर, पाठीवर मारहाण करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. २४ नोव्हेंबर रोजी दीपक कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळू काळे, आशिष काळे, विकास खळगे या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करत आहेत.