Site icon सक्रिय न्यूज

काँग्रेसचे ”चाणक्य” काळाच्या पडद्याआड……..!

नवी दिल्ली दि.२५ –  काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचे बुधवारी 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.30 वाजता निधन झाले आहे. ही महिती त्यांचा मुलगा फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.

फैजल म्हणाले की, “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. तसेच मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनासाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.

दरम्यान, अहमद पटेल यांना 1 महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी ते संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभागी झाले होते. काँग्रेसचे चाणक्य म्हणून त्यांना ओळखल्या जात होते.

शेअर करा
Exit mobile version