Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील डोका (हादगाव) शिवारात महिलेचा खून……..?

केज दि.२५ – तालुक्यातील डोका (हादगाव) येथे आत्याच्या वर्षश्रध्दाधासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला असून दगडाने ठेचून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

सांगली येथे आपल्या कुटुंबासोबत राहणारी मीरा बाबुराव रंधवे ही तिची आत्या गांधारी इनकर हिच्या वर्षश्रद्धासाठी डोका येथे आली होती. दरम्यान दि.२४ रोजी रात्री सुमारे ९.३० च्या सुमारास डोका येथील गावच्या पश्चिम दिशेने वाहणाऱ्या बोभाटी नदी शेजारील  शेतातील भांगे-इनकर वस्ती वरील  वडिलांच्या घराकडे जात असताना रस्त्यात तिचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला असल्याची माहिती समजते. पूर्ण चेहरा व डोके चेंदामेंदा केले आहे. घटनास्थळावर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, पोलिस जमादार अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केजचे राऊत, अहंकारे तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप गुन्हा दाखल झाला नसून नेमकी घटना काय आहे? हे तपासात निष्पन्न होईल.

 

शेअर करा
Exit mobile version