केज दि.२६ – तालुक्यातील डोका (हादगाव) येथे आत्याच्या वर्ष श्राध्दाधासाठी सांगली येथून माहेरी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना दि. २५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. मात्र केज पोलिसांनी प्रेतावर अंत्यसंस्कार करण्या पुर्वीच तपास करत एक संशयित चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे.
सांगली जिल्ह्यातील माधव नगर, सटण्याचा मळा येथे आपल्या कुटुंबा सोबत राहणारी मीरा बाबुराव रंधवे ही महिला तिची आत्या गांधारी इनकर हिच्या वर्षश्रद्धासाठी डोका (हादगाव) येथे आली होती. तिचा दि.२५ नोव्हेंबर रोजी डोका ता. केज शिवारातील बोभाटी नदी शेजारील रामचंद्र भांगे यांच्या शेतातील तुरीच्या पिकात तीक्ष्ण हत्याराने गळा कापून व चेहरा ओळखू येऊ नये म्हणून डोक्यात दगड घालून पूर्ण चेहरा चेंदामेंदा करून खून करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली होती.
दरम्यान पोलिसांना अशी माहिती प्राप्त झाली की, सदर महिला ही दि. २४ रोजी केज येेेथे सामान व खरेदीसाठी नातेवाईक सोबत गेली होती. त्यानंतर तिने नातेवाईकांना एका प्रवासी रिक्षाने गावाकडे पाठवून दिले व ती केज येथे मागे थांबली. त्या नंतर तिने एका पुरुषा सोबत केज येथील कानडी रोड वरील एका दुकानातून कपडे खरेदी केले. नंतर तो पुरुष व मीरा हे दोघे एका मालवाहू रिक्षातुन डोका येथे गेले. त्या नंतर रात्री ७ वा. पासून पुढे तिचा तीक्ष्ण हत्याराने गळा कापून व डोक्यात दगड घालून अज्ञात मारेकऱ्याने खून केला.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, पोलिस जमादार अमोल गायकवाड, हनुमंत गायकवाड, मतीन शेख, पो.ना.गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केजच्या तपास पथकाचे वैभव राऊत, पप्पू अहंकारे, शेख तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यावेळी तपासी पथकाला घटना स्थळावर एक मोबाईल आणि प्रेताजवळ कपडे खरेदी केलेल्या दोन पिशव्या आढळून आल्या त्या वरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून घटनास्थळावर आढळून आलेला मयत मीरा हीच मोबाईल व त्या पिशव्या वरील दुकानाच्या नावावरून तपासला सुरुवात केली कपड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेज वरून मयत मीरा सीबत असलेला तो पुरुष कोण? याचा तपास पोलीस घेत असताना तो मस्साजोग ता. केज येथील एका ४५ वर्षीय इसमाला पोलीस पथकाने रात्री त्यास संशयित म्हणून ताब्यात घेतले पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी मयत मीरा रंधवे हिचे चुलते त्रिंबक ईनकर यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ५०९/२०२० भा.दं.वि. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मीरा रंधवे हिचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथे करण्यात आले असून तिच्यावर दि.२६ रोजी डोका (हादगाव) येथे अंत्यसंस्कार करण्या पुर्वीच पोलिसांनी तिच्या संशयित मारेकऱ्यास ताब्यात घेतले.
कपडे खरेदीच्या पिशव्या वरून तपासला गती
खून का केला असावा? हे समजत नव्हते. कारण चोरी म्हणावे तर मयत मिराच्या अंगावरील दागिने चोरीला गेले नव्हते. मग हा खून का केला असावा? हा प्रश्न पोलिसां समोर असताना अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांनी सुतावरून स्वर्ग गाठण्यासाठी प्रेता शेजारी पडलेल्या कपडे खरेदीच्या पिशव्या वरच्या दुकानाच्या नावावरून त्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून संशयित ताब्यात घेतला आहे.
दरम्यान पोलिसांनी मयत मीरा हिच्या सोबत सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या इसमाची ओळख पटवण्यासाठी मीराची मेव्हनी कांता व मीराची लहान मुलगी सुप्रिया हिच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेतले आहे.