राजकोट दि.२७ – गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग लागण्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील उदय शिवानंद असे या रुग्णालयाचे नाव आहे. सर्वप्रथम ही आग रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागली होती. गुरुवारी मध्यरात्रीची ही घटना आहे.रूग्णालयात 33 जणांवर उपचार सुरु होते. तर आयसीयूमध्ये एकूण 11 जण उपचार घेत होते. यामधील 5 जणांचा मृत्यू झालाय. या आगीतील जखमींना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.