दिल्ली – विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षण घेण्यासाठी भाषेचा अडथळा निर्माण होऊ नये या अनुषंगाने आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मातृभाषेतही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यातबाबत निर्णय घेतला असल्याने प्रादेशिक भाषेतून स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार असल्याने निर्णयाचे स्वागत होत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून देशातील काही निवडक आयआयटी आणि एनआयटीमधून मातृभाषेतून शिक्षणाची सुरुवात करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती.यामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाबाबत पुढील शैक्षणिक वर्षापासून मातृभाषेत शिक्षण घेता येणार असून याबाबत देशातील निवडक आयआयटी आणि एनआयटी संस्थांची निवड करण्यात येणार आहे”, अशी माहिती मिळाली आहे.
तसेच जेईईच्या परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या व्यतिरिक्त आणखी ९ स्थानिक भाषांमधून घेण्यात येणार आहेत.