मुंबई दि.28 – महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. मात्र मुलाखतीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रहार केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. मात्र त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, पण ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट प्रहार फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो. परंतु दसरा मेळाव्याचं भाषण असो की सामन्याची मुलाखत यातून मुख्यमंत्री संयमी नसल्याचं दिसून आलं असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.