मुंबई दि.29 – अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला असून चंद्रकांत पाटील यांच्या चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खरी ठरली नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक म्हणाले, “सरकार पडणार असं सांगणारी ज्योतिष विद्या खरी नाही हे सिद्ध झालंय. पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते मात्र त्या चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खरी झाली नाही.”ठाकरे सरकार हे पूर्णपणे अपयशी, गोंधळलेलं आणि दिशा नसलेलं सरकार आहे. वर्षभर तुम्ही कसं काम करता, ते जनतेने पाहिलं. आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
त्यांच्या या वक्तव्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवाय महाविकास आघाडी सरकार 5 वर्षं पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.