समाजसेवक नवनाथ झगडे यांना सत्यशोधक पुरस्कार प्रदान
डी डी बनसोडे
पुणे दि.29 – प्रती महात्मा फुले वाडा कात्रज पुणे च्यावतीने देण्यात येणारा सत्यशोधक पुरस्कार यंदा समाजसेवक नवनाथ यांना प्रदान करण्यात आला. महात्मा फुले पगडी, रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कुमार आहेर प्रति महात्मा फुले वाडा पुणे कात्रज अध्यक्ष व सुनील माने भाजपा पुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुणे कात्रज परिसरातील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे व हाकेला धावणारे नवनाथ झगडेे सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आम्ही सत्यशोधक पुरस्कार नवनाथ झगडे यांना प्रदान केला असल्याची माहिती प्रती महात्मा फुले वाडा कात्रज पुणे जनरल सेक्रटरी कुमार आहेर यांनी दिली.