नवी दिल्ली – दि.1 – तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरचे दर ठरवितात. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने त्यानुसार गॅस सिलिंडरच्या दरात फरक असतो. मात्र नेहमी प्रमाणे आजही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला असला तरी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात ऑक्टोबरच्या किंमतीत काही बदल करण्यात आलेला नाही. तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार 14.2 किलोचा सबसिडी नसलेला गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये 594 रुपये आहे. कोलकातामध्ये 620.50 रुपये, मुंबईत 594 रुपये आणि चेन्नईत 610 रुपये आहे.
या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केलेले नाही. मुंबईसह अन्य शहरांमध्ये देखील किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, १९ किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरमध्ये ५५ रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे.