मुंबई – दि.२ – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भगिनी आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.या आजारात होणारा त्रास मी अनुभवला असून त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरून दिला आहे.
मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये. कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.